मुंबई -: हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. 
          या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, शालेय शिक्षणमंत्री राजेन्द्र दर्डा, महापौर सुनिल प्रभू, मुंबई महानगरपालिका आयुक्त सिताराम कुंटे, मुंबई जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 
Top