नळदुर्ग -: मराठवाड्याचे प्रति सानेगुरूजी व कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ धुरंदर राजकारणी म्हणून ओळखले जाणारे तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरूजी यांनी सोमवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी आपला राजकीय संन्यास जाहीर केला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या शुभारंभनिमित्त सिद्रामप्पा आलुरे गुरूजी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पारनेर येथे जावून विनोबा भावे यांच्या समाधीवर यापुढे 'आपण राजकारण करणार नाही', अशी शपथ घेतल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. सहकार क्षेत्रामध्ये राजकारण्यानी आपल्या स्वार्थासाठी सहकार क्षेत्र मोडीत काढले असे सांगून खासगी कारखानदारी सुरू करून डबल रोलची भूमिका काही राजकारणी मंडळी करीत आहेत. त्यांच्यापासून जनतेनी सावध राहिले पाहिजे. यापुढे सत्तेची सूत्रे सोपविताना पक्ष, संघटना याचा विचार न करता व्यक्ती व त्या व्यक्तीचे कार्य पाहूनच त्याच्या हाती सत्तेचे सूत्रे द्यावीत, तरच सहकार चळवळ टिकेल, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना बोलताना केले. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष नितीन कासार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अॅड. दिपक आलुरे, नगरसेवक देविदास राठोड, श्री तुळजाभवानी कारखान्याचे माजी चेअरमन सिद्रामप्पा खराडे, सोसायटीचे संचालक शिवदास कांबळे, शिवाजीराव मोरे आदीजण उपस्थित होते.
* नेताजी मुळे
* नेताजी मुळे