नळदुर्ग -: लोहगाव (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीच्‍या सरपंच व उपसरपंच पदाची निवड मंगळवार दि. 27 नोव्‍हेंबर रोजी झाली असून सरपंचपदी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या सौ. सुज्ञानबाई कांबळे यांची तर उपसरपंचीपदी भिवा इंगोले यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे जाहीर करण्‍यात आले.
लोहगाव ग्रामपंचातीच्‍या नऊ जागेसाठी झालेल्‍या निवडणुकीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पुरस्‍कृत पॅनलने आठ जागा जिंकून वर्चस्‍व मिळविले आहे. तर कॉंग्रेस पुरस्‍कृत पॅनलचा दारूण पराभव होऊन त्‍याना एक जागेवर समाधान मानावे लागले. राष्‍ट्रवादी पक्षाकडे सलग दुस-यांदा सत्‍ता कायम राखण्‍यास यश मिळविले. मंगळवार दि. 27 नोव्‍हेंबर रोजी सरपंच व उपसरपंच पदासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी राष्‍ट्रवादी पक्षाकडून सरपंचपदासाठी सौ. सुज्ञानबाई कांबळै व उपसरपंचपदासाठी भिवा इंगोले यांचा प्रत्‍येकी एक अर्ज आल्‍याने ही निवड बिनविरोध झाल्‍याचे निवडणुक निर्ण अधिका-यानी जाहीर करताच समर्थकांनी मोठा जल्‍लोष केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून खैराते यानी तर सहाय्यक म्‍हणून ग्रामसेवक एस.जी. वानोळे यानी काम पाहिले. यावेळी प्रा. शिवाजी मारेकर, सुनिल बनसोडे, नागनाथ शिंगाडे, शाम शिंगाडे, हरीचंद दबडे, भरत बनसोडे, राम कांबळे, विलास पाटील, राजेंद्र जाधव, राजीव पाटील, दिगबर दबडे, गुलचंद दबडे यांच्‍यासह राष्‍ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. सरपंच व उपसरपंचाच्‍या निवडणुकीच्‍या बैठकीत कॉंग्रेस पक्षाच्‍या पॅनलचे नूतन सदस्‍य प्रशांत भास्‍कर देशमुख यांनी गैरहजर होते.
 
Top