नळदुर्ग -: साखर कारखान्यानी ऊसाला तीन हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवार दि. १७ नोव्हेंबर रोजी अणदूर (ता.तुळजापूर) बंद पुकारला होता. त्यास व्यापार्‍यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता आजचा बंद हा कडकडीतपणे होता व तो शांततेत पार पडला.
            शेतकरी संघटनेच्यावतीने अणदूर (ता. तुळजापूर) येथील बसस्थानकासमोर यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर ऊसाला भाव द्यावा या मागणीसाठी रास्ता रोको, निषेध सभा, मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १७ नोव्हेंबर रोजी अणदूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे े सकाळपासूनच अणदूर येथील बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. यापुढे परिसरात शेतकरी सभा, जागरण फेरी आदी कार्यक्रम घेवून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरविंद घोडके यांनी जाहीर केले. हा बंद यशस्वी होण्यासाठी आप्पासाहेब  फेटे, बत्तू मुळे, सदाशिव हागलगुंडे, राजू कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी, महमद शेख, राजू मुळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. व्यापारी संकुलन हुतात्मा चौक, अण्णा चौक, चिवरी पार्टी, खंडोबा मंदीर परिसर, विश्‍वनाथ चौक, बसवेश्वर चौक आदीसह इतर ठिकाणी बाजारपेठ बंद असल्याचे दिसून आले. यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


 
Top