पंढरपूर -:  कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून किंबहुना देशभरातून लाखो भाविक पंढरपूरात दाखल होतात. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वारक-यांना चांगल्या सुविधा देण्याबाबत अधिका-यांनी - कर्मचा-यांनी दक्ष रहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिले.
           कार्तिकी यात्रेनिमित्त शासकीय विश्रामगृहावर अधिका-यांची बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. डेंग्यू रोगाच्या पार्श्चभूमीवर यात्रा कालावधीमध्ये प्रशासनाने अधिकच दक्षता बाळगावी तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाहीत याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे अशी सूचना केली. येत्या वर्षभरात चार हजाराहून अधिक शौचालये बांधून पूर्ण करण्याबाबत आपण आग्रही असल्याचेही देशमुख म्हणाले. 
          यंदा भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अधिका-यांनी - कर्मचा-यांनी सेवकाच्या भूमिकेत काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, आ. भारत भालके, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी रविंद्र जाधव, तहसीलदार सचिन डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

 
Top