नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे गायरान जमिनीतील शेतात अज्ञात व्यक्तीने पेंड व युरियामध्ये विष मिसळून ठेवलेलेते खाद्य शेळ्याखाल्ल्याने एका म्हैससह ५० पेक्षा अधिक शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना शनिवार रोजी घडली. अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे उपस्थितांमधून चर्चिले जात आहे.
सिध्दू राठोड यांच्या १२ शेळ्या, बाळू राठोड यांच्या २ शेळ्या, रामचंद्र चव्हाण यांच्या ४ शेळ्या, इंद्रजित जाधव यांची १ म्हैस, जालींदर पवार यांच्या २ शेळ्या, संतोष राठोड यांची शेळीचे सहा पिल्ले, रमेश राठोड याच्या ४ शेळ्या, गुलाब राठोड यांच्या ४ शेळ्या आदीसह अनेकांच्या शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. तर गाय, शेळ्या व म्हशीना मोठ्याप्रमाणावर विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
येडोळा (ता. तुळजापूर) येथील गायरान जमिन अतिक्रमणमुक्त प्रकरणाला वेगळे वळण लागले असून दि. २ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक, तलाठी यांनी पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमण काढण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याने अतिक्रमण काढता आले नाही. दि. २ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी अतिक्रमण केलेल्या शेतातील पिकांमध्ये जनावरे सोडली होती. यावेळी अतिक्रमणधारक व ग्रामस्थात मारहाणीचे प्रकार घडले होते.
