बार्शी (रामचंद्र इकारे) -: येथील यशवंतराव चव्‍हाण सांस्‍कृतिक भवनमध्‍ये दि. 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत आमदार दिलीप सोपल यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त निमंत्रितांच्‍या राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. आनंदयात्री प्रतिष्‍ठानच्‍यावतीने ही स्‍पर्धा आयोजित केली आहे. एकूण दोन लाख रूपये पारितोषिकांची भव्‍य राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धा असून राज्‍यातील सर्वात मोठया पारितोषिकांची ही स्‍पर्धा ठरणार असल्‍याची माहिती प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष नागेश अक्‍कलकोटे यांनी सांगितले.
        बार्शी (जि. सोलापूर) येथील राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धेतील विजेत्‍या स्‍पर्धकाना व अभिनय स्‍त्री-पुरूष, दिग्‍दर्शन, नेपथ्‍य, प्रकाश, संगीत, संहिता, वेश व रंगभूषा आदींना भरगच्‍च पारितोषिक देण्‍यात येणार आहे. स्‍पर्धेत राज्‍यातील, राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धातील बक्षीसपात्र एकांकिका मिळविलेल्‍या नाट्यसंस्‍थांना प्रवेश देण्‍यात येणार आहे. स्‍पर्धेसाठी सादरीकरणाच्‍या दिवशी सदर संघाची जेवणाची व राहण्‍याची सोय संयोजकाकडून करण्‍यात आलेली आहे. तरी इच्‍छुक नाटयसंस्‍थांनी मागील तीन वर्षात प्राप्‍त केलेल्‍या पारितोषिकांच्‍या माहितीसह दि. 5 डिसेंबरपर्यंत विहित नमुन्‍यात प्रवेशिका भरून द्यावी. अधिक माहितीसाठी स्‍पर्धाप्रमुख प्रा. रणजित गायकवाड (8600533650), स्‍पर्धा समन्‍वयक रामचंद्र इकारे (9822802016) यांच्‍याशी संपर्क साधावा.
   
* राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धेतील पारितोषिके
* प्रथम पारितोषिक        -  61 हजार रूपये, करंडक व सन्‍मानपत्र
* द्वितीय पारितोषिक      -  41 हजार रूपये, करंडक व सन्‍मानपत्र  
* तृतीय पारितोषिक        -  21 हजार रूपये, करंडक व सन्‍मानपत्र
* उत्‍तेजनार्थ पारितोषिक  -    11 हजार रूपये, करंडक व सन्‍मानपत्र
           अशी सांघिक बक्षिसे देण्‍यात येणार आहेत. याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्‍ये अभिनय स्‍त्री-पुरूष, दिग्‍दर्शन, नेपथ्‍य, प्रकाश, संगीत, संहिता, वेश व रंगभूषा अशी प्रत्‍येकी प्रथम 3 हजार रूपये, द्वितीय 2 हजार रूपये, तृतीय 1 हजार रूपये, अशी एकूण 40 वैयक्तिक बक्षिसे ठेवण्‍यात आली आहेत.
 
Top