नळदुर्ग  -: चिवरी (ता. तुळजापूर) येथे कंदुरीच्या कार्यक्रमास जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. तर दोन बालके गंभीर झाल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता नळदुर्ग-तुळजापूर या राज्य मार्गावरील गंधोरा पाटीजवळ एका अवघड वळणावर घडली.
               युवराज कोंडीबा घाडगे (वय ३७ वर्ष, रा. वेताळ गल्ली, तुळजापूर) असे अपघातात मरण पावलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तर दोन बालके (नाव समजू शकले नाही) गंभीर जखमी झाले आहेत. यातील मोटारसायकलवर (क्रं. एम.एच. २५ एस. २२१४) युवराज घाडगे याने आपल्या मेहुणीच्या दोन लहान मुलाना बसवून तुळजापूर ते नळदुर्गकडे रस्त्याने चिवरी येथे कंदुरीच्या कार्यक्रमास जात असताना गंधोरा पाटीच्या पुढे एका अवघड वळणावर नळदुर्गहून तुळजापूरकडे भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यात युवराज याचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे बालके गंभीर जखमी झाले. या घटनेची फिर्याद सुरेश कोंडीबा घाडगे (वय ३२ वर्ष, रा. वेताळ गल्ली, तुळजापूर) यानी नळदुर्ग पोलीसात दिल्याने अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत.
 
Top