मुंबई -: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सहायक संचालक (माहिती )/माहिती अधिकारी/अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने, गट-ब, उपसंपादक/माहिती सहायक, कनिष्ठ तांत्रिक सहायक, चित्रपट जोडणीकार, वरिष्ठ दूरचित्रवाणी यांत्रिक, चित्रकार, वाहन चालक, गट-क व संदेश वाहक/शिपाई/स्वच्छक-नि-हमाल/हमाल, गट-ड या पदांसाठी लेखी परीक्षा १८ नोव्हेंबर २०१२ रोजी लायन्स पायोनियर हायस्कूल, भाऊदाजी रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-१९ येथे आयोजित करण्यात आली आहे.
संबंधित उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविण्यात आले असून ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त झाले नसतील अशा उमेदवारांनी www.mahapariksha.in/dgipr/dgposts.asp या संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र काढून घ्यावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.