उस्मानाबाद -: ग्रामस्थाची सनद हा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत ग्रामीण जनतेच्या अडी -अडचणी सोडवण्यासाठी लोकाभिमुख पंचायत प्रशासन दिवस म्हणून ग्रामस्थ दिनाचे आयोजन दि. 19 नोव्हेंबर 2012 रोजी कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद,उस्मानाबाद येथे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलेला आहे.
या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी वरील वेळेत आपली निवेदन समक्ष सादर करावीत. उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.
* निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना आवाहन
उस्मानाबाद -: युरोपिय देशांना द्राक्ष निर्यात करु इच्छिणाऱ्या द्राक्ष बागायतदारांनी नविन नोंदणी व मागील वर्षी नोंदणी केलेल्या त्यांच्या द्राक्ष बागेचे नुतनीकरण व नोंदणी जिल्ह्याचे नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांच्या कार्यालयाकडे दि.30 नोव्हेंबर 2012 पूर्वी सुधारित प्रपत्र -2 मध्ये द्राक्ष बागेची नवीन नोंदणी व नुतनीकरण करण्याकरिता भ्रमणध्वनी क्रमांक, बागेचा नकाशा व 7/12 ची प्रत अर्जासोबत जोडावी. तसेच रु.50 च्या चलनाव्दारे फी भरुन विहीत मुदतीत सादर करावे.
तरी उस्मानाबाद तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांनी 30 नोंव्हेबर 2012 पर्यंत नोंदणी व नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी एस.पी.जाधव, उस्मानाबाद यांनी केले आहे.
* डेंग्यूच्या नियंत्रणासाठी जनतेने योग्य काळजी घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन
उस्मानाबाद -: जिल्ह्यामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे डेंग्यु आजाराचे रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. डेंग्यु आजाराचा प्रसार एडीस इजिप्ती डासाचे मादीची पैदास घरातील साठवणीच्या पाण्यामध्ये होते.या आजाराची लक्षणे ताप,अंग, डोकेदुखी,या सारखी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, आरोग्य संस्थेत उपचार करुन घ्यावा.
हा आजार टाळण्यासाठी -पाणी साठे आठवडयातुन 1 दिवस कोरडे करुन कोरडा दिवस पाळावा, पाणी साठे झाकुन ठेवण्यात यावेत, पाणी वापरावयाचे पाणी साठे घासुन- पुसुन स्वच्छ करुन भरावीत. तसेच घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत पाणी साठे, वाहते करुन डबके साचु देवु नयेत. डास अळी, भक्षक गप्पी मासे सोडण्यात यावेत, गटारी व घाण पाण्यात जळके ऑईल टाकावे, डासापासुन बचावासाठी मच्छरदाणी व रासायनीक क्वाईलचा वापर करावा, घरोघरी आरोग्य कर्मचारी-स्वयंसेवक अबेट टाकण्यासाठी आल्यावर पाणी साठयामध्ये अबेट टाकुन घ्यावे, धुर फवारणी झाल्यावर घरांची दारे 15 मिनीटे बंद ठेवावीत, अंगभरुन कपडे वापरावेत, आपल्या परिसरात डेंग्यु आजाराचा फैलाव होवू नये, यासाठी जनतेनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद व जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
* माजी सैनिकांचा मेळावा
उस्मानाबाद -: उस्मानाबाद जिल्हयातील माजी सैनिक, युध्द विधवा व अवलंबीत साठी दि. 25 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3-30 वाजेपर्यंत भगत पॅव्हिलीयन बॉम्बे इंजिनीयर ग्रुप व सेंटर खडकी, पुणे येथे माजी सैनिकांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व माजी सैनिक, युध्द विधवा व अवलंबीत यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.