![]() |
डॉ. एन.एस. कुंभार |
अणदूर -: येथील डॉ. एन.एस. कुंभार यांना शहीद अशोक कामटे गौरव पुरस्कार जाहीर झाले असून हा पुरस्कार येत्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सोलापूर येथे शिंदे चौकातील शिव स्मारक येथे भव्य कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
श्री सिध्दरामेश्वर मानव विकास प्रतिष्ठान सोलापूर यांच्यावतीने शहीद अशोक कामटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना अशोक कामटे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी देण्यात येणारा शहीद अशोक कामटे हा पुरस्कार पंधरा प्रमुख मान्यवराना जाहीर करण्यात आला आहे. त्यात अणदूर (ता. तुळजापूर) येथील डॉ. एन.एस. कुंभार याना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे श्री सिध्दरामेश्वर मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय म्हेत्रे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. कुंभार यांचे पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, संतोष नरे, बसवराज नरे, देवानंद खजुरे, महेश कारले, चंद्रकांत गुड्ड, महावीर कंदले यांच्यासह अनेकानी अभिनंदन केले आहे.