उस्‍मानाबाद -:  जागतिक मधुमेह दिनानिमित्‍त जनजागृतीसाठी उस्‍मानाबाद येथे भव्‍य सायकल रॅली काढण्‍यात येणार आहे.  उस्‍मानाबाद जिल्‍हा सायकल असोशिएशन आणि रोटरी क्‍लब उस्‍मानाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मधुमेहाबाबत समाजात जागृती व्‍हावी, यासाठी सायकल फेरीचे आयोजन करण्‍यात आले आहे. दि. १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. त्‍या निमित्‍ताने ही रॅली काढण्‍यात येणार आहे. ही रॅली बुधवार दि. १४ नोव्‍हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शिवाजी चौक येथून प्रारंभ होईल. तरी या रॅलीत युवक, युवती आणि जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मदन कुलकर्णी यानी केले आहे.
 
Top