उस्मानाबाद -: बोरगाव राजे (ता. उस्‍मानाबाद) येथील कॉंग्रेस पक्षाच्‍या बहुसंख्‍य कार्यकर्त्‍यांनी कॉंग्रेसलाच हात दाखवून राष्‍ट्रवादीमध्‍ये प्रवेश केल्‍याने राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.  
          उस्‍मानाबाद तालुक्‍यातील बोरगाव (राजे)  येथील काँग्रेस पक्षाच्या तीस कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मंगळवारी (दि. 20) शहरातील राष्ट्रवादीभवन येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बालाजी नांदे, चांद पटेल, खलील पटेल, समाधान नांदे, तानाजी ढवळे, माऊली नांदे, रामा नांदे, अंकुश चौगुले यांच्यासह तीस जणांनी प्रवेश केला. माजी राज्यमंत्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सरपंच इंद्रजित नांदे, पंचायत समिती सदस्य सुनील खळदकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष मुराद पठाण आदी उपस्थित होते. 

 
Top