तुळजापूर -:  भरधाव स्‍कुटी रस्‍त्‍यावर घसरून झालेल्‍या अपघातात स्‍कुटीस्‍वार महिलेचा रूग्‍णालयात उपचाराच्‍या मृत्‍यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाल्‍याची घटना तुळजापूर-उस्‍मानाबाद रस्‍त्‍यावर शुक्रवार दि. 23 नोव्‍हेंबर रोजी दुपारी एक वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडली आहे.
पुष्‍पा गोविंद म्‍हेत्रे (वय 45 वर्षे, रा. बँक कॉलनी, उस्‍मानाबाद) असे अपघातात मरण पावलेल्‍या महिलेचे नाव आहे. तर कोमल चव्‍हाण असे जखमी महिलेचे नाव आहे. यातील पुष्पा म्हेत्रे या स्कुटीवरुन तुळजापूरहून उस्मानाबादकडे जात असताना शुक्रवार रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी शहरानजीकच्या एका ढाब्याजवळ आल्यानंतर स्कूटी घसरल्याने पुष्पा म्हेत्रे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी डॉ. कल्याणी यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्‍हणून नोंद करण्यात आली आहे.  याअपघातात कोमल चव्हाण या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
Top