नळदुर्ग -: येथील मराठा गल्ली येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताह सोहळा गुरुवार दि. १५ नोव्हेंबर रोजीपासून प्रारंभ होणार आहे. पारायण सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
                नळदुर्ग येथे दि. १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेले ज्ञानेश्‍वरी पारायणाचे ३४ वे वर्ष असून अधिष्ठान ह.भ.प. तुळशीराम मुळे, पुरोहित बंडोपंत पुराणिक हे राहणार आहेत. पारायण कालावधीत पहाटे काकडा आरती, सकाळी माऊलीची पूजा त्यानंतर सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी महिलांचे भजन व भारुडाचा कार्यक्रम, गाथा भजन त्यानंतर सायंकाळी प्रवचन, नामजन, हरिपाठ, रात्रो हरीकिर्तन त्यानंतर १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हरिजागर आदी कार्यक्रम होणार आहेत. ह.भ.प. बलभीम बागल (चिकुंद्रा), ऍड. पांडुरंग लोमटे (उस्मानाबाद), बाबुराव पुजारी (पाडोळी), वसंतराव जाधव (येडोळा), वसंतराव सुर्यवंशी (तोरंबा) राजाभाऊ पाटील (वागदरी) आदींचे ऊनुक्रमे गुरुवार दि. १५ ते मंगळवार दि. २० नोव्हेंबर या कालावधीत प्रवचन होणार आहे. तर ह.भ.प. राम गायकवाड महाराज (चिकुंद्रा), विरपक्ष महाराज (कानेगांवकर), बोधले महाराज (धामणगाव), महेश महाराज (कानेगांवकर), गुरुवर्य मधुकर महाराज (दिंडेगावकर), गुरुवर्य एकनाथ महाराज (वाशी) यांचे रात्री नऊ वाजता किर्तन होणार आहे.त्याचबरोबर श्रीरंग भजनी मंडळ नळदुर्गसह सराटी, अणदूर, रुक्मिणी महिला भजनी मंडळ उस्मानाबाद, संत मिरा महिला महिला भजनी मंडळ लातूर आणि मुर्टा, चिकुंद्रा येथील महिला भजनी मंडळाचा भजन होणार आहे. या  व्यक्तिरिक्त दररोज दुपारी १२ ते ३ भजनाचा व भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
                 बुधवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी पसायदानचे कार्यक्रम ह.भ.प. गुरुवर्य एकनाथ महाराज वासकर वाशी यांच्या हस्ते होवून काल्याचे किर्तन श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा यांच्या हस्ते होणार आहे. बलभीम मुळे यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, तरी याचे लाभ घ्यावे असे आवाहन समस्त गावकरी, पारायण समिती व शिवशाही तरुण मंडळाने केली आहे.

 
Top