नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्यातील १९ गावांकरीता १२४ सौरपथदिवेकरीता सुमारे लाख १८ हजार ८00 रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी सांगून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकासाच्या क्लस्टरमधील तालुक्यातील १९ गावांना गाव प्रवेश उपक्रमांतर्गतसौरपथदिवे मंजूर करण्यात आले असून ते तातडीने संबंधित गावात बसविण्याची सूचना संबंधिसत खात्यात देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भाग दिव्याने उजळून निघणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे २, गोंधळवाडी ३, पिंपळा (खु) ७, पिंपळा (बु) १२, कोरेवाडी ३, देवकुरुळी ६, धोत्री ६, मसला (खु) १३, सांगवी मार्डी ३, कामठा ४, आपसिंगा १२, सांगवी काटी ११, माळुंब्रा ७, सावरगाव १0, वडगाव काटी ७, जळकोटवाडी २, गंजेवाडी ४, सुरतगाव ४, तामलवाडी ८ असे एकूण १२४ सौरपथदिवे १९ गावात बसविण्यात येणार आहेत. याकरीता प्रत्येकी पथदिव्यास शासन १८ हजार ७00 रूपये देणार असून एकूण २३ लाख १८ हजार ८00 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी वरील ग्रामपंचायतीने आवश्यक त्या ठिकाणी सदरचे पथदिवे बसवावेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट कार्यक्रमाशिवाय इतर भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणार्या कार्यक्रमांतर्गत ही योजना राबविण्यात आली असून टप्प्याटप्प्याने इतर कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. सध्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाणी पातळीत वाढ करणे गरजेचे असून, यासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.