मुंबई पोलिस दलाच्या पुर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पदावर कार्यरत असणारे अशोक कामटे आयपीएस अधिकारी होते. सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदावर उल्लेखनीय कामगिरी बजावल्यानंतर कामटे यांची नुकतीच मुंबई पोलिस दलात बदली झाली होती.
       ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक म्हणूनही कामटे यांचा कार्यकाळही चांगलाच गाजला. खेळाची आवड असलेले कामटे पॉवर लिफ्टर आणि बॉडी बिल्डर म्हणूनही प्रसिद्ध होते.त्यांच्या नावावर पॉवर लिफ्टींगमधील तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात कामटे अतिरेक्‍यांच्या गोळीबारात शहीद झाले.
 
Top