हेमंत करकरे १९८२ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदावर कार्यरत होते. देशातील काही निवडक आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक.
"रॉ’ मध्ये अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर २००७ मध्ये मुंबई पोलिस दलात परतलेले करकरे पोलिस सहआयुक्त (प्रशासन) या पदावर रुजू झाले. "रॉ’ मधील अनेक वर्षांच्या कामाचा अनुभव आणि गुप्तहेरांचे देशव्यापी नेटवर्क असल्याने त्यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकावर नियुक्ती करण्यात आली.
मालेगाव बॉम्बस्फोटानंतर हिंदुत्ववादी संघटनांचा बॉम्बस्फोटांसारख्या कृत्यातील सहभाग उघडकीस आणणारा हा अधिकारी 26/11 च्या मध्यरात्री ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांसोबत लढताना धारातीर्थी पडला. राज्य पोलिस दलाचा चेहरा बदलून त्याचे आधुनिकीकरण करण्यात करकरे यांची कामगिरी मोलाची आहे.