मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून दबदबा असलेला अधिकारी म्हणून विजय साळसकर परिचित होते. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचे कंबरडे मोडणा-या या अधिका-याने आतापर्यंत ७८ हून अधिक सराईत गुन्हेगारांचा खातमा केला.
१९८३ च्या बॅचचे पोलिस अधिकारी असलेले साळसकर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पदावर होते.
मुंबई पोलिस दलात साळसकर यांच्या चोवीस वर्षांच्या सेवेत त्यांनी अमर नाईक, साधु शेट्टी, जग्गू शेट्टी, कुंदन सिंग रावत, जहूर मसंदा, सदा पावले, विजय तांडेल सारख्या सराईत गुन्हेगारांना यमसदनी धाडले. मेट्रो सिनेमाजवळ अतिरेक्यांशी मुकाबला करताना साळसकर धारातीर्थी पडले.