मुंबई -: महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी ऑस्ट्रेलियाचे स्वागत असून अत्याधुनिक रस्ते, पूल निर्मिती आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विविध क्षेत्रात या संधी उपलब्ध असल्याचे ग्रामविकास तथा वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे रिजनल डेव्हलपमेंट मंत्री सायमन क्रीन यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुंबई शहराचे पालकमंत्री पाटील यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. दोन्ही देशांचा विकास दर, कर प्रणाली, पायाभूत सुविधांचे निर्माण आणि व्यवस्थापन, शेती, सहकार, निर्यात संधी, विकास प्रकल्पांमध्ये सार्वजनिक खासगी सहभाग, पाण्याचा पुनर्वापर आदी विषयांवर या भेटी दरम्यान उभयतांनी सविस्तर चर्चा केली.