नळदुर्ग -: मानेवाडी (ता. तुळजापूर) शिवारात एका ऊसतोड कामगार पोटदुखीच्या आजारामुळे मरण पावल्याची घटना शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दत्ता रघुनाथ दफडे (वय 35 वर्षे, रा. शेकापूर, ता. कंधार) असे पोटदुखीच्या आजाराने मरण पावलेल्या ऊस तोड कामगाराचे नाव आहे. मानेवाडी (ता. तुळजापूर) येथे गणपती बर्वे यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. दरम्यान ऊसतोड कामगार दफडे याचा पोटदुखीच्या आजाराने मृत्यू झाल्याची खबर उध्दव भाटापूरे यांनी नळदुर्ग पोलीसात दिली. पुढील तपास हवालदार सुनिल मनगिरे हे करीत आहेत.