नळदुर्ग -: जळकोट (ता. तुळजापूर) येथे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के यांच्या वतीने वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय भोगे यांच्या स्मरणार्थ संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गरजू माता-भगिनींना साडी-चोळी व फराळाचेही वाटप करण्यात आले.
प्रारंभी निवृत्त पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम, रमेश सोनटक्के यांच्या हस्ते कै. भोगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर प्रा. वृषाली देशमुख, प्रा. शशिकांत देशमुख, शरयू माळी, सतीश माळी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर परिसरातील गरीब महिलांना दिवाळी भेट म्हणून गणेश सोनटक्के, सविता सोनटक्के, अशिष सोनटक्के, बाळासाहेब सोनटक्के व परिवाराच्या वतीने साडी, चोळी व फराळाचे साहित्य तसेच ज्येष्ठाना धोतर जोडीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास संगीत विशारद शिवकुमार उरगुंडे, माजी सरपंच रमणप्पा मारगे, तबला वादक एकनाथ पांचाळ, बसवराज मेंगशेट्टी इरणप्पा औसेकर, बबन मोरे, यशवंत कदम, शिवराज स्वामी, यासह नागरीक उपस्थित होती.