नळदुर्ग -: येथील व्यासनगरमध्ये रविवार रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला पारायण समितीच्यावतीने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. येथे महिला भक्तांच्यावतीने आयोजित ३३ व्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहाने साजरा करून सोमवार रोजी समारोप करण्यात आला. या सप्ताहामध्ये दररोज किर्तन, प्रवर्चन, भारूड, भजन यासह धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सप्ताहासाठी महिला पारायण समिती व बचट गट सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील नागरीक उपस्थित होते.