पालकमंत्री ढोबळे यांचा सोलापूर जिल्‍हा दौरा
सोलापूर -: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता  मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर  जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.-
       आज शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता सिध्देश्वर एक्स्‍प्रेसने सोलापूरला येतील. सकाळी 7.20 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी. (स्थळ- शासकीय विश्रामगृह, सोलापूर). तसेच संपूर्ण दिवसभर सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.


वनमंत्री ना. डॉ. पतंगराव कदम यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर :  वने, पुनर्वसन व मदतकार्य आणि भूकंप पुनर्वसन मंत्री ना. डॉ.पतंगराव कदम हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
     शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता बामणी ता. खानापूर, जि. सांगली येथून शासकीय वाहनाने अकलूज येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.11 वाजता माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव डॉ. धवलसिंह यांच्या विवाहास उपस्थिती. (स्थळ - अकलूज ता. माळशिरस) सायंकाळी 6.30 वाजता अकलुज येथून वाहनाने शहाजीनगर ता. इंदापुर जि. पुणेकडे प्रयाण. रात्रौ 9.30 वाजता शहाजीनगर ता. इंदापुर जि. पुणे येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन. व रात्री 10.45 वाजता सिध्देश्वर एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण.


पदुम मंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर :- पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण  हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
           शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर 2012 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुंबई येथून शासकीय वाहनाने पुणे - शिरवळ मार्गे शासकीय विश्रामगृह अकलूज येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.11 वाजता माजी राज्यमंत्री प्रतापसिंह शंकररावजी मोहिते पाटील यांचे चिरंजीव विजयीभव डॉ. धवलसिंह व श्रीमंत सरदारकुमार अभयसिंह फाळके रा. ग्वालियर (मध्यप्रदेश) यांची सुकन्या चि.सौ.कां. उर्वशीराजे यांच्या शुभविवाहास उपस्थिती (स्थळ - अकलूज ता. माळशिरस) सायंकाळी 6.15 वाजता अकलुज येथून शासकीय वाहनाने शहाजीनगर ता. इंदापुर जि. पुणेकडे प्रयाण करतील.

ना. वसंत डावखरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उप सभापती ना. वसंत डावखरे हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
         शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर 2012 रोजी सायंकाळी 5 वाजता तळेगांव जि. पुणे येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर येथे आगमन व राखीव. सांयकाळी 6 वाजता माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चि. डॉ. धवलसिंह यांच्या शुभविवाहास उपस्थित   (स्थळ - अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर) राहून रात्रौ 23.55 वाजता कुर्डुवाडी ता. माढा येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील. 

सहकार मंत्री ना.हर्षवर्धन पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर :- सहकार व संसदीय कार्य मंत्री ना. हर्षवर्धन पाटील  हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
            शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर 2012 रोजी पहाटे 5 वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने कुर्डुवाडी जि. सोलापूर येळो आगमन. सकाळी 10 वाजता कुर्डुवाडी येथून मोटारीने इंदापुरकडे प्रयाण. सांयकाळी 4.15 वाजता बावडा ता. इंदापुर जि. पुणे येथून अकलूज येथे आगमन व प्रतापसिंह मोहिते पाटील यांचेकडील विवाह समारंभास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता अकलूज येथून मोटारीने निरा भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगरकडे प्रयाण. रात्रौ 11.45 वाजता बावडा ता. इंदापुर जि. पुणे येथून मोटारीने कुर्डुवाडी ता. माढा जि. सोलापूर येथे आगमन व  सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील. 



 
Top