सोलापूर :- महसूल, पुनर्वसन व मदतकार्य, भुकंप पुनर्वसन, सहकार पणन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रकाश सोळंके हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन, सकाळी १०.०५ वाजता श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. येथील प्रशासकीय कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - वाखरी, पंढरपूर - पुणे रोड वर, पंढरपूर) सकाळी १०.२० वाजता दि. पंढरपूर अर्बन को - ऑप बँक लि. येथील नवीपेठ शाखा उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ - टिळक स्मारक मंदिर पटांगण, पंढरपूर) दुपारी १२ वाजता राखीव (स्थळ - पंतनगर, रेस्ट हाऊस जवळ, पंढरपूर) सोईनुसार पंढरपूर येथून अजित पवार यांच्या समवेत हेलिकॉप्टरने कराड जि. साताराकडे प्रयाण