सोलापूर -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण हे सोलापूर दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
सोमवार दि ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी ९ वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण.
मंगळवार दि ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अणदूर ता. तुळजापूर येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ १०.४५ वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
* पालकमंत्री मधुकरराव चव्हाण जिल्हा दौ-यावर
उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. सोलापूरहून अणदूर, ता. तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी ११ वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण. ११.४५ वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सोईनूसार तुळजापूर येथून अणदूरकडे प्रयाण व मुक्काम.
मंगळवार,दि. ६ रोजी सकाळी १० वा. अणदूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी १०.३० वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. ११.३० वाजता पिण्याचे पाणी आरक्षण बैठक, स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी दु. १२.१५ वा. अन्नधान्य वितरण आढावा बैठक. स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय. तेथून सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व राखीव. रात्री ७ वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.