सोलापूर : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार दि 4 नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे राखीव. सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी. (स्थळ - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर), सकाळी 10 वाजता श्री. अजित पवार व ना. प्रकाश सोळंके, राज्यमंत्री महसूल यांच्या स्वागतासाठी उपस्थिती (स्थळ - हेलिपॅड, पंढरपूर), सकाळी 10.05 वाजता श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. येथील प्रशासकीय कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - वाखरी, पंढरपूर - पुणे रोड वर, पंढरपूर) सकाळी 10.20 वाजता दि. पंढरपूर अर्बन को - ऑप बँक लि. येथील नवीपेठ शाखा उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ - नवीपेठ, पंढरपूर) सकाळी 10.30 जाहिर शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ - टिळक स्मारक मंदिर पटांगण, पंढरपूर) दुपारी 12 वाजता राखीव (स्थळ - पंतनगर, रेस्ट हाऊस जवळ, पंढरपूर) दुपारी 12.30 वाजता शासकीय वाहनाने पुणेकडे प्रयाण.