सोलापूर -: राज्य शासनाने नुकताच निर्णय घेऊन रब्बी हंगाम सन 2012-13 साठी पिक विमा योजना जाहिर केली आहे. या योजनेमध्ये सर्व शेतक-यांनी सहभाग घ्यावा व हंगामामध्ये विविध समस्यामूळे / आपत्तीमूळे होणारे पिक नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरुन योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन अशोक किरनळळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांनी कले आहे.
राष्ट्रीय कृषी विम्यासाठी गहू बागायत, गहृ जिरायत, हरभरा, करडई, सूर्यफुल, कांदा तसेच उन्हाळी भुईमुग आदि पिकांचा समावेश आहे. सदर पिकांचा कृषि विमा हप्ता भरणेची अंतिम मुदत पेरणी पासून एक महिना किंवा दिनांक 31.12.2012 यापैकी जी आधी असेल ती असून केवळ ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2012 अखेर आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमूळे होणारी नुकसान भरपाई हे कृषि विमा कंपनीकडून वैयक्तिस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक आपत्तीमूळे योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतक-यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे. त्या संबंधित वित्तीय संस्थेस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त अधिसूचीत पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये कमाल विमा संरक्षित रक्कम सरासरी उत्पन्नाच्या 150 टक्के पर्यंत घेता येते. तसेच यावर्षी रब्बी हंगामातील गहू, जिरायत, ज्वारी, हरभरा व करडई या अधिसूचित पिकासाठी उच्च जोखीमस्तरावर विमा संरक्षण लागू करण्यास मान्यतादिलेली आहे. उक्त योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी स्वत: बँकेकडे विमा प्रस्ताव करणे बंधनकारक आहे.
या योजनेमध्ये सर्वसाधारण जोखीमस्तर 80 टक्के असलेल्या अधिसूचित पिकासाठी भाग घेणा-या अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना विमा हप्त्यामध्ये केंद्र व राज्याकडून 10 टक्के अनुदान दिले जाणार आहे तसेच उच्च जोखीम स्तरावरील अधिसूचित पिकांना वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारला जाणार आहे पंरतू सहभाग घेतलेल्या शेतक-यांनी सर्वसाधारण जोखीमस्तरानुसार येणारी विमा हप्ता रक्कम भरावयाची आहे. या विमा हप्तापेक्षा जास्त असणारी विमा हप्ता रक्कम राज्य शासनाकडून अनुदान स्वरुपात देयक राहील.
रब्बी सन 2011-12 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 56834 लाभार्थ्यांनी पिक विमा योजनेमध्ये भाग घेतलेला होता रब्बी सन 2011-12 चा पिका विमा 50447 लाभार्थ्यांनी रक्कम रु. 272002874.80 मंजूर झालेला आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2012 पर्यंत ज्वारी पिकाचा विमा शेतक-यांनी भरावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे