सोलापूर -: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर रोजी रात्रौ शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे मुक्काम. शनिवार दि. 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.30 वाजता श्री. विठ्ठलाची शासकीय महापुजा. पहाटे 3 वाजता श्री. रुक्मिणीची शासकीय महापूजा. संपूर्ण दिवसभर सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.
रविवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता दक्षिण भारत जैन सभा आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रम (स्थळ - श्राविका संस्था नगर, सम्राट चौक, सोलापूर) संपूर्ण दिवसभर सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम.
सोमवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयासंबंधी आयोजित विविध बैठकांना उपस्थिती. (स्थळ - शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम).. रात्रौ सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.