नळदुर्ग : येथील बालाघाट शिक्षण संस्‍थेच्‍या कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी औरंगाबाद येथे नुकतेच झालेल्या युवक महोत्सवात दोन कला प्रकारात यश संपादन केले जात आहे. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दि. २५ ते २९ ऑक्टोंबर या कालावधीत झालेल्या  युवक महोत्सवात नळदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी लोकगीत व पोवाडा या कला प्रकारामध्ये यश मिळविले. लोकगीत कला प्रकारामध्ये लक्ष्‍मण पोफळे, अविनाश गायकवाड, सुरवसे नागनाथ, भोसले सावित्री, चव्हाण सुप्रिया, चव्हाण सुजाता, कुलकर्णी मनिषा, गुळवे रुपाली यांनी सादर केलेल्या माझी मैना गावाकडं राहिली या लोकगीताला प्रथम पारितोषिक तर पोवाडा या कलाप्रकरामध्ये लक्ष्मण पोफळे, अविनाश गायकवाड, नागनाथ सुरवसे, सावित्री भोसले, मनीषा कुलकर्णी, सुप्रिया चव्हाण, सुजाता चव्हाण यांनी सादर केलेल्या 'हुंडाबळी या विषयावरील पत्र लिहीते बहीण-भावाला, यावे घेवून लाख गाडीला' या पोवाड्यास द्वितीय पारितोषिक मिळाले. इतर कलाप्रकारामध्ये अविनाश गायकवाड, पारप्पा दुपारगुडे, सिद्धार्थ व्हतांळकर, प्रकाश साखरे, गणेश बरगे, अतुल बनसोडे, सागर चव्हाण, सुनिल राठोड, मल्हारी गायकवाड, अजय साखरे, यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. वरील विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.पेशवे, उपप्राचार्य प्रा.एन.एम.माकणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. उमाकांत चनशेट्टी, प्रा.एन.एस.कदम, डॉ.पी.एस. गायकवाड, प्रा.आय.एस.भोरे, प्रा.संतोष पवार, हार्मोनियम वादक निलेश वाघमारे, ढोलकी वादक बंटी देडे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्‍तरातून अभिनंदन होत आहे. 
 
Top