नळदुर्ग -: सोलापूर-हैदराबाद राष्‍ट्रीय महामार्गावरून जाणा-या धावत्‍या बसमधून विवाहित तरूणीने उडी मारल्‍याची घटना दि. 3 नोव्‍हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्‍याच्‍या सुमारास दाळींब (ता. उमरगा) शिवारात घडली. या घटनेमुळे प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. सदरील विवाहितेने वेड्याच्या भरात चालत्या बसमधून उडी मारले होते. त्‍या महिलेचा नातेवाईक व पोलिसांनी शोध केल्यानंतर नळदुर्ग बसस्‍थानकात ती सुरक्षीत मिळाल्‍याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मनिषा अनुप गायकवाड (वय २६) असे बसमधून उडी मारलेल्‍या विवाहितेचे नाव आहे. यातील मनीषा ही  एस.टी. बस (क्र.एम.एच.२०, बी.एल.१८८०) ने हैद्राबाद येथून पती अनुप समवेत उस्मानाबादकडे जात होती.  सदरील बस उमरगा ओलांडून दाळींब शिवारात आली असता नवजीवन प्रेरणा केंद्रासमोर चालत्या बसमधून दरवाजा उघडून उडी टाकली. बस वाहक राजेंद्र लोकरे व प्रवाशांनी आरडा ओरड केली तरी त्या महिलेने वेडाच्या झटक्यात उडी मारल्याने बस थांबवून तिचा शोध घेतला पण मनिषा आढळून न आल्याने पती अनुप गायकवाड, चालक प्रकाश जाधव, वाहक राजेंद्र लोकरे यांनी येणेगुर दुरक्षेत्र गाठून पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस नाईक चंदू पवार, शिवलिंग घोळसगाव, पती व वाहक चालकांनी शोध घेतला तरी मनिषा सापडली नाही. बस येणेगुरु दुरक्षेत्र कार्यालयात चौकशीसाठी ठेवून प्रवाशांना जावू दिले. आष्टा मोड येथे मनिषा एका बस मध्ये चढत असताना त्यातील प्रवाशांनी मनिषाला ओळखून वाहक राजेंद्र लोकरे यांना फोनवर माहिती देवून मनिषाला नळदुर्ग बस स्थानकात थांबवीत असल्याचे सांगितले. त्‍यानंतर नळदुर्ग बस स्थानकात पोलिस व पती अनुपसह नळदुर्ग बसस्‍थानकात येवून मनिषाला ताब्यात घेतले. त्‍यास फक्त खरचटले असून सरमकुंडी येथील मनिषाचे आई वडील येवून त्याचे दवाखान्याचे कागदपत्र दाखवून वेडाच्या झटक्यात कृत्य केल्याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने मनिषा गायकवाड हिस तिच्‍या आई वडिलांच्या स्‍वाधीन करण्‍यात आले. 

 
Top