नळदुर्ग -: भरधाव टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होवून ठार झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा ताड या ठिकाणी घडली आहे. याबाबत नळदुर्ग पोलीसात शुक्रवार रोजी सायंकाळी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र उर्फ धोंडीबा मारुती सरडे (वय ३२ वर्षे, रा. नांदुरी, ता. तुळजापूर) असे अपघातात मरण पावलेल्या मोटारसायकलचे नाव आहे. नागनाथ शिवरुद्र लामजने (रा. सुपतगाव, ता. उमरगा) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. टेम्पो (क्रं. एमएच २५ टी १९६०) हा निष्काळजीपणे व भरधाव वेगाने मोटारसायकल (क्रं. एमएच २५ एस ६०३९) स्वार राजेंद्र सरडे यास धडक़ दिल्याने तो गंभीर जखमी झाला, ही घटना दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास हिप्परगा ताड येथे घडली. अपघातानंतर जखमीस औषधोपचारासाठी मदत न करता व अपघाताची माहिती पोलीसाना न देता निघून गेला, अशी फिर्याद मुक्ताबाई राजेंद्र उर्फ धोंडीबा सरडे (वय २५ वर्षे, रा. नांदुरी, ता. तुळजापूर) यानी नळदुर्ग पोलीसात दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर हे करीत आहेत.