तुळजापूर : येथे खुल्या युवती स्पर्धेस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला असून विजेत्‍या स्‍पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्‍यात आले आहे. नवनिर्मिती महिला मंडळ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्‍या युवती स्‍पर्धा घेण्‍यात आले.
ही स्‍पर्धा तुळजाभवानी पुजारी मंडळ सभागृहात आयोजित पार पडल्‍या. या स्पर्धेतील विजेत्यांना नगराध्यक्षा सौ. अर्चना गंगणे यांच्या हस्ते पारितोषिक देण्‍यात आले यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहन गोस्वामी, रेखा परमेवर, विद्याताई सावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.रांगोळी स्पर्धेत सुदर्शना बोदले तर सामूहिक नृत्य स्पर्धेत जगदंबा ग्रुप आणि स्त्री भ्रूणहत्या नाटिकेत पूजा पवार यांच्या ग्रुप प्रथम आला.याशिवाय समूहनृत्य स्पर्धेत अष्टभूजा ग्रुप द्वितीय तरे नाटिकेमध्ये वृक्षसंवर्धन व हुंडाबळीवरील नाटिकांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले.रांगोळी स्पर्धेत निंबाळकर द्वितीय तर साठे तृतीय आले.नृत्य स्पर्धेत मृणाल रत्नपारखी प्रथम, दीपिका नायगावकर द्वितीय व सुप्रिया साठे तृतीय आले. प्रास्ताविक मीना सोमाणी, सूत्रसंचालन मोहिनी लोंढे यांनी केले तर आभार अश्‍विनी हिरोळकर यांनी मानले.
 
Top