उस्मानाबाद -: पोलीसानी विविध मारलेल्या छाप्यात सुमारे पाच हजार रूपयाची अवैध दारू जप्त केली असून याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कैलास गुंजाराम राठोड (रा. वत्सलानर, अणदूर, ता. तुळजापूर), गोपीनाथ पुरा चव्हाण (रा. होळी तांडा, ता. लोहारा), रामेश्वर अशोक शिंदे (रा. येडशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. पोलीसानी अणदूर, होळी तांडा व येडशी या ठिकाणी अचानक छापा मारून वरील तिघांकडून सुमारे ४ हजार ६०० रूपयाचा माल जप्त केली आहे. ही कारवाई दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* दोन जुगा-यांना अटक; सहा हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद -: मुंबई मटका नावाचा जुगार खेळत असताना पोलीसानी अचानक छापा मारून दोन जुगा-यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ५ हजार ९८० रूपयाचा मुद्देमाल पोलीसानी हस्तगत केली. ही घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल रामू राठोड (वय २४ वर्षे), लक्ष्मण माधव हारके (दोघे रा. बलसुर, ता. उमरगा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. यातील दोघे बलसुर (ता. उमरगा) येथील स्वामी पान स्टॉल जवळ मुंबई मटका नावाचा जुगार खेळत होते. त्यावेळी पोलीसानी अचानक छापा मारून दोघाला ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून जुगा-याच्या साहित्यासह ५ हजार ९८० रूपयाचा माल पोलीसानी जप्त केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* बेकायदेशीर शोभेच्या दारूप्रकरणी कारखान्यावरील धाडीत सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
येरमाळा -: शोभेच्या दारूचे ज्वालाग्रही पदार्थ विनापास परवाना तयार करीत असताना पोलीसानी अचानक छापा मारून सुमारे १ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. एकजण फरार झाला आहे. ही घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथे घडली.
सचिन शिवाजी उकरंडे (रा. तेरखेडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील सचिन उकरंडे व त्याच्या साथीदार रमेश सरवदे हे दोघे तेरखेडो येथे स्फोटक पदार्थ, सुतळी अॅटमबॉम्ब, शोभेच्या दारूबचे ज्वालग्रही पदार्थ बनवित होते. त्यावेळी अचानक स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी छापा मारून त्याना रंगेहाथ पकडले. मात्र रमेश सरवदे हा पोलीसांच्या तावडीतून फरार झाला. वरील दोघानी तयार केलेल्या शोभेच्या दारूच्या साहित्यासह सुमारे १ लाख ३३ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल पोलीसात हस्तगत केला. याप्रकरणी सचिन उकरंडे यास अटक करून पोलीस उपनिरीक्षक मुकुंद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांविरूद्ध येरमाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
* विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा
शिराढोण -: लग्नासाठी एक लाख रूपये घेऊन ये म्हणून एका विवाहितेस महिलेस छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी पांडुरंग कदम (रा. तडवळा, ता. अंबेजोगाई) राजाभाऊ विश्वनाथ कदम, द्रोपदीबाई राजाभाऊ कदम, कु. शितल राजाभाऊ कदम (तिघे, रा. रा. तडवळा, अंबेजोगाई), गिता अदिनाथ शितोळे (रा. नायगाव, ता. कळंब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. वरील चौघांनी संगनमत करून अश्विनी कदम या विवाहित महिलेस त्याच्या आईवडिलांकडून लग्नासाठी एक लाख घेऊन ये म्हणून सतत शिवीगाळ करीत असे. उपासीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करून जाचहाट केलाव घरातून हाकलून दिल्याची फिर्याद अश्विनी कदम यानी कळंब न्यायालयात दिल्यावरून न्यायालयाच्या आदेशाने वरील लोकांविरूद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार ननवरे हे करीत आहेत.
* मोटारसायकलवरून पडल्याने मोटारसायकलस्वार ठार
ढोकी -: मोटारसायकल स्लीप होवून पडल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ढोकी शिवारात घडली.
सलमान रूस्तुम पठाण (वय २५ वर्षे, रा. तडवळा) असे मरण पावलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. यातील सलमान पठाण हा त्याच्या बजाज प्लॅटीना कंपनीची मोटारसायकल (क्रं. एमएच ०२ एपी १४०) वरून स्वार होऊन ढोकी कडून तडवळा कडे जात असताना ढोकी शिवारातील राहुल देशमुख याच्या शेताजवळील रोडवरून मोटारसायकल स्लीप होऊन खाली पडल्याने त्यात सलमान पठाण याच्या डोक्यात जबरमार बसुन तो जागीच ठार झाला, अशी फिर्याद रहीम मोहंमद शेख (रा. तडवळा) यानी ढोकी पोलीसात दिली. याप्रकरणी मयत सलमान पठाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार शेख हे करीत आहेत.
* अणदूर येथे महिलेचा विनयभंग
अणदूर -: एका महिलेस अश्लिल भाषेत शिवीगाळ करून वाईट हेतूने तिचा विनयभंग केल्याची घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान अणदूर (ता. तुळजापूर) येथे घडली.
शंभुलिंग बोंगरंजे (रा. अणदूर) याने अणदूर येथील एका महिलेच्या घरासमोर ती एकटी असल्याचे पाहून त्यास अश्लिल भाषेत शिवीगाळ केली आणि वाईट हेतून तिचा विनयभंग केला असल्याची फिर्याद सदरील महिलेने नळदुर्ग पोलीसात दिल्यावरून वरील आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत.
* तुळजापूर येथुन मोटारसायकलची चोरी
तुळजापूर -: येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात लावलेली मोटारसायकल काही अज्ञात चोरटयानी चोरून नेली. ही घटना दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
राजेंद्र शिवाजी जाधव (लाईनमन) याने आपली टीव्हीएस सुझुकी कंपनीची मोटारसायकल (क्रं. एमएच १३ झेड ६३३५) ही महावितरण कार्यालयाच्या आवारात लावली होती, त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदरील मोटारसायकल चोरून नेली आहे. मोटारसायकलची किंमत दहा हजार रूपये असून सदरील मोटारसायकीचा शोध घेतला ती मिळुन आल्याने दि. ६ नोव्हेंबर रोजी राजेंद्र यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
* ट्रकची चोरी केलेल्या अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद
उस्मानाबाद -: अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेल्याची घटना दि. १ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथील बाजार मैदानाजवळ घडली. ट्रकची किंमत सुमारे दोन लाख रूपये असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बाजार मैदान उस्मानाबाद येथे संतोष सोमनाथ क्षिरसागर (रा. कुंभारी, ता. तुळजापूर) याने त्याची ट्रक (क्रं. एमएच ०४/६५०९) मागील पंधरा दिवसांपासून लावली होती. मात्र दि. १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदरील ट्रक चोरून नेली, तिचा शोध घेतला ती मिळुन आली नाही. ट्रकची किंमत सुमारे दोन लाख रूपये आहे. याप्रकरणी दि. ६ नोव्हेंबर रोजी संतोष क्षिरसागर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध उस्मानाबाद पोलीसात नोंद करण्यात करण्यात आला असून पुढील तपास हवालदार ननवरे हे करीत आहेत.