उस्मानाबाद -: जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी, पाच पोलीस नाईक याना पोलीस हवालदार पदी, तर पाच शिपाई याना पोलीस नाईक पदी असे मिळून पंधरा पोलीस कर्मचा-यांना पोलीस अधिक्षक सचिन पाटील यानी पदोन्नती देऊन एकप्रकारे पोलीस कर्मचा-यांना दिवाळीची भेट दिली आहे.
हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आलेले पोलीस कर्मचारी असून कंसात सध्या कार्यरत असलेले पोलीस ठाणेचे नाव आहे. ज्योतीराव नेमिनाथ जगताप (भूम), ज्ञानेश्वर पांडुरंग नागरगोजे (परंडा), तानाजी शंकर शिंदे, (मुख्यालय उस्मानाबाद), चंद्रकांत साहेबराव देशमुख (ए.सी.बी. उस्मानाबाद), रामेश्वर परशुराम घुले (कळंब) इत्यादीचा समावेश आहे. त्याचबरोबर पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आलेले औदुंबर जनार्दन नरवडे (बेंबळी), विठ्ठल संभाजी होनाजे (तामलवाडी), भालचंद्र नरहरी गंगावणे (नळदुर्ग), राजाराम एकनाथ चिखलीकर (ए.सी.बी. उस्मानाबाद), पदमाकर पंडीतराव गोरे (मुख्यालय उस्मानाबाद) आदीजण तर पोलीस नाईक पदावर पदोन्नती झालेले कर्मचारी सुहास धोंडीराम सोनके (कळंब), अविक्षीत शिवाजीराव काटवटे (वाहतुक शाखा उस्मानाबाद), मुजीबखान बाबुखान पठाण (क्युआरटी पथक उस्मानाबाद), अमित अधिकराव सिद (वाहतुक शाखा उस्मानाबाद), श्रीकांत जयप्रकाश चौधरी (परंडा) आदी जणांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्वांना जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यानी शुभेच्छा दिले आहेत.