नळदुर्ग - जळकोट (ता. तुळजापूर) येथील बोरमन तांडा येथे जिल्हास्तरीय भव्य खुल्या टेनिल बॉल क्रिकेट स्पर्धा दि. १२ नोव्हेंबर रोजीपासून आयोजित केले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास आकर्षक रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.
शिवसेनेच्यावतीने जळकोट (ता. तुळजापूर) येथे दि. १२ नोव्हेंबर पासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजयी संघाला ११ हजार रुपये तर उपविजयी संघाला पाच हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर तृतीय क्रमांकाच्या संघास ३ हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत खेळाडूना वैयक्तीक बक्षीसेही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३५१ रुपये प्रवेश शुल्कासह क्रिकेट संघानी आपली नावे १० नोव्हेंबर पर्यंत प्रदीप जाधव, मोहन राठोड, निशांत राठोड, प्रवीण राठोड यांच्याजवळ नोंदवावित असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दि. १२ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन उमरग्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, तुळजापूर तालुका प्रमुख राजअहमद पठाण, सुधीर कदम, तुळजापूर उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, भाजपचे शिवाजी कदम, उपसरपंच बंकट बेडगे, पंचायत समिती सदस्य अर्जून कदम, अरुण भोगे, अरुण लोखंडे, खंडू भोगे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन हणुमंत सुरवसे आदीजण उपस्थित राहणार आहेत.