कसाब खटल्‍याचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे :-

26 नोव्हेंबर 2008 : अजमल कसाब व इतर नऊ अतिरेक्यांचा मुंबईवर हल्ला

27 नोव्हेंबर 08 : कसाबला अटक आणि नायर रुग्णालयात भरती

29 नोव्हेंबर 08 : अतिरेक्यांच्या ताब्यातून सर्व जागा मुक्त, कसाब वगळता सर्व अतिरेकी ठार

30 नोव्हेंबर :
कसाबची हल्ल्याची कबुली (27/28 डिसेंबर रोजी ओळख परेड)

13 जानेवारी 2009 : एम.एल.ताहिलियानी यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती

16 जानेवारी 09 : कसाबसाठी आर्थर रोड कारागृहाची निवड

5 फेब्रुवारी 09 : कसाबचा डीएनए नमुना कुबेरमधील वस्तूंशी जुळला

20/21 फेब्रुवारी 09 : कसाबचा कबुलीजबाब न्यायाधीशांनी नोंदवला

22 फेब्रुवारी 2009 : उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

25 फेब्रुवारी 2009 :
कसाबविरुद्ध आरोपपत्र दाखल

01 एप्रिल 2009 : अंजली वाघमारे यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती

15 एप्रिल 2009 : अंजली वाघमारे  यांनी कसाबचे वकीलपत्र सोडले

16 एप्रिल 2009 : अब्बास काझमी यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती

17 एप्रिल 2009 : कसाबचा कबुलीजबाब न्यायालयात उघडला

20 एप्रिल 2009 : सरकारी पक्षाचे कसाबवर 312 आरोप

06 मे 2009 :
86 आरोप निश्चित; परंतु कसाबकडून आरोपांचे खंडन

8 मे 2009 :
पहिल्या साक्षीदाराची साक्ष, कसाबला ओळखले

23 जून 2009 : हाफिज सईद, जकी उर रहेमान लकवीसह 22 जणांविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट

30 नोव्हेंबर 09 : अब्बास काझमी यांनी कसाबचे वकीलपत्र सोडले

01 डिसेंबर 09 :
के.पी.पवार यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती

16 डिसेंबर 2009 :
सरकारी पक्षाकडून 26/11 खटला पूर्ण

18 डिसेंबर 2009 : कसाबकडून सर्व आरोपांचे खंडन

31 मार्च 2010 : खटल्याचे कामकाज पूर्ण, न्यायाधीशांकडून 3   मेपर्यंत निर्णय राखीव

03 मे 2010 : कसाब दोषी; सफीउद्दीन अहमद आणि फहीम अन्सारी निर्दोष

06 मे 2010 :
फाशीची शिक्षा

21 फेब्रुवारी 2011 :
मुंबई उच्च् न्यायालयाकडून फाशीवर शिक्कामोर्तब

मार्च 2011 : फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी कसाबचा अर्ज

10 ऑक्टोबर 11 : सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती

10 ऑक्टोबर 2011 : आपले वय लहान असल्याचा कसाबचा दावा

18 ऑक्टोबर 2011 : महाराष्ट्र सरकारकडून फहीम अन्सारी व सफीउद्दीन अहमद यांना निर्दोष सोडल्याच्या निर्णयाविरुद्ध आव्हान

23 फेब्रुवारी 2012   :
सर्वोच्च् न्यायालयाने 26/11चे सीसीटीव्ही फुटेज पाहिले

25 एप्रिल 2012     : अडीच महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च् न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

29 ऑगस्ट 2012 :
कसाबच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब

 
Top