सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2012 या महिन्यात मुदती संपणा-या दिनांक 29 ऑक्टोबर 2012 रोजी ग्रामपंचायत निवडणूक 2012 या कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सदर 138 ठिकाणापैकी एकूण 12 ठिकाणी बिनविरोध जाहिर झालेले आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत 2012 चा निवडणूकीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व निवडणूक काळात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांना मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सोलापूर जिल्ह्यातील ज्या निवडणूक क्षेत्रात निवडणूक व मतमोजणी आहे तेथील देशी / विदेशी दारु दुकाने, बिअरबार, परमिट रु, ताडी विक्री दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर 2012 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुध्द कारवाई करण्यात असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
* कार्तिकी यात्रेनिमित्त मद्य विक्रीस बंदी
सोलापूर :- मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी कार्तिकवारी पंढरपूर यात्रा 2012 काळात पंढरपूर शहरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक 23 व 24 नोव्हेंबर 2012 रोजी पंढरपूर शहारातील सर्व मद्य व ताडी दुकाने विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुध्द कारवाई करण्यात असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.