उस्मानाबाद -: सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण फी परीक्षा फी या शिष्यवृतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख शासनाने १५ नोव्हेंबर २०१२ ठरविलेली आहे. मागील शैक्षणिक वर्ष २०१-१२ मध्ये एकूण १६ हजार ९८८ विद्यार्थ्यानी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी अनुसुचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग या प्रवर्गातील भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण फि व परीक्षा फी या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावे.
ही बाब संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणून दयावी व विद्यार्थ्यांच्या अडचणी आल्यास संबंधितानी त्वरीत मदत करावी. जर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज न भरल्यास विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित राहील्यास याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर राहील, याची नोंद घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन शिष्यवृतीबाबत अधिक माहिती E.Scholarship/Maha.E.Seholarship या Website वर उपलब्ध आहे,असे कळविण्यात आले आहे.
* पंतप्रधान शिष्यवृतीसाठी 1 0 नोव्हेंबरपर्यंत आवेदन पत्र पाठवण्याचे आवाहन
* उस्मानाबाद :- जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवांना सूचित करण्यात येते की. केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडून शैक्षणिक वर्ष २०१२-१३ साठी पंतप्रधान शिष्यवृती योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. तरी जिल्हयातील पात्र माजी सैनिक/ विधवांनी आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०१२-१३ साठी पंतप्रधान शिष्यवृती योजनेअंतर्गत आवेदनपत्र सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
तरी आवेदन पत्र, चेक सिट प्रमाणे सर्व कागदपत्रांसह दिनांक १० नोव्हेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करावीत. आवेदन पत्र चेक सिट संकेत स्थळ www.desw.fow.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे. तसेच दिनांक १० नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ****