नळदुर्ग -: येथील तुळजाभवानी साखर कारखाना दृष्टी शुगरच्या ताब्यात असताना तुळजाभवानीच्या कार्यकारी संचालकानी कसल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कारखाना गेटला कुलूप ठोकून बेकायदेशीररित्या कारखान्याचा ताबा घेतल्याने दृष्टी शुगरचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. त्याचबरोबर मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असून याप्रकरणी दृष्टी शुगरच्या जनरल मॅनेजरनी पोलीसात तक्रार करुन चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे.
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना हा दृष्टी शुगर ऍऩ्ड डिस्टीलरीज उद्योग समूह मुंबई यानी साखर आयु़क्त पुणे यांच्याशी रितसर करार करुन ६ वर्षासाठी भाडेतत्वावर चालविणयास घेतलेला आहे. सध्या श्रीतुळजाभवानी कारखाना दृष्टी शुगरच्या ताब्यात असतानाही तुळजावानी कारखाऩ्याचे प्रभारी कार्यकारी संचालकानी कारखान्याच्या गेटला कुलूप लावून पूर्व सूचना न देता बेकायदेशीररित्या ताबा घेतला आहे.
दृष्टी शुगरचे तुळजाभवानी कारखान्यामध्ये सुमारे ७५ लाखाचे मोलॅसेस, स्टोअर मटेरियल ७५ लाखाचे सध्या कारखान्यात असून ५० लाख रुपये सुरक्षा अनामत रक्कम असे मिळूर सुमारे एकूण २ कोटी रुपये तुळजाभवानी कारखाऩ्याकडे आहेत. असे आसतानाही दृष्टी शुगरच्या मालकीचे १२०० मेट्रीक टन मोलॅसेस राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या परवानगीने विक्री करीत आहोत. मोलॅसेस घेवून जाणेसाठी दि. २ नोव्हेंबर पासून कारखाना साईटवर मोलॅसेसचे टॅकर मोलॅसेस भरण्यासाठी उभे आहेत. पंरतू श्रीतुळजाभवानी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी गेटला कुलूप लावून अनाधिकृतपणे कारखान्याचा ताबा घेतल्यामुळे टॅकरमध्ये मोलॅसेस भरून पाठवता येत नाही असे सांगून कार्यकारी संचालकाच्या मनमानी कारभारामुळे आमचे मोठया प्रमाणाावर नुकसान होत आहे. कारखान्याशी दृष्टी शुगरचा संपर्क तुटल्याने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने शासकीय, निमशासकीय, देय ऱक्कमा व कर्मचार्याचा पगार इत्यादी देय रक्कमा देता येत नाहीत. त्यामुळे दृष्टी शुगर ऍन्ड डिस्टीलरीजची विनाकारण बदनामी होत आहे. याप्रकरणी चौकशी करुन पंचनामा करावा व दोषीवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.