सोलापूर  :- तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी, जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी, विभागीय आयुक्त स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचया दुस-या सोमवारी, मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी, लोकशाही दिनाचा कार्यक्रम मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येईल, अर्ज स्विकृतीचे नियम पुढीलप्रमाणे - अर्ज विहीत नमुन्यात असावा (प्रपत्र 1 अ व 1 ब), तक्रार/निविदा वैयक्तिक स्वरुपाची असावी, लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी, आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी/ आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्याने विभागीय लोकशाही दिनात व विभागीय लोकशाही दिनानंतर 2 महिन्याने मंत्रालयीन लोकशाही दिनात अर्ज करता येईल. चारही स्तरावरील लोकशाही दिनानंतर 2 महिन्याने मंत्रालयीन लोकशाही दिनात अर्ज करता येईल. चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबीशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवाविषयक/आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्श कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. 
              तसेच लोकशाही दिनाच्या कार्यपध्दतीची अधिक माहितीसाठी सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या बेवसाईटवर उपलब्ध असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर यांनी एका पत्र्ैकादन्वये कळविले आहे. 
 
Top