सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील युवक-युवतींना ट्रायसेम प्रशिक्षण केंद्र, सोलापूर व लघु औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा येथे स्वयंरोजगाराची प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात ट्रायसेम प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी ट्रायसेम प्रशिक्षण केंद्र, सोलापूर व लघु औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा येथे कार्यरत आहेत. सोलापूर केंद्रातील मोटार रिवायडींग, वेल्डींग व जॉयटींग रेडिओ टि. व्ही. दुरुस्ती, नळ कारागीर व करमाळा येथे वायरमन या व्यवसायाची सोय आहे. हे प्रशिक्षण 1 जानेवारी 2013 पासून सुरु होत आहे. तरी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन एच. पी. मुळीक, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सर्व पंचायत समिती कार्यालयाकडे, गट विकास अधिकारी अथवा विस्तार अधिकारी (उद्योग) यांच्याकडे संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी सर्व पंचायत समिती कार्यालयाकडे, गट विकास अधिकारी अथवा विस्तार अधिकारी (उद्योग) यांच्याकडे संपर्क साधावा.
सेतु केंद्रातून आधार कार्डाची प्रत उपलब्ध
सोलापूर : आधार योजना देशभरात राबविली जात आहे. ही योजना राबविण्यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. देशात सर्वाधिक आधरची नोंदणी आणि आधार क्रमांकाची निर्मिती महाराष्ट्र राज्यात झालेली आहे. तथापि बहुतेक रहिवाशांना आधार ओळखपत्राची प्रत छापून घेता येते. ही प्रत विशिष्ठ ओळखपत्र प्राधिकरणाकडून डिजीटली स्वाक्षरीत असून त्याचा उपयोग आधार ओळखपत्र प्रत्यक्ष प्राप्त होईपर्यंत रहिवाशांना करता येईल. रहिवाशांना eaadhaar.uidai.gov.in या पोर्टलवर लॉग ईन करुन आधार पत्राची प्रत छापता येईल. ज्या रहिवाशांकडे इंटरनेट सुविध, प्रिंटर्स उपलब्ध नाहीत अशा रहिवाशांकरिता महा-ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, संग्राम केंद्र मध्ये रु. 2/-(रु. दोन फक्त) या दराने आधार पत्राची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तथापि ज्या रहिवाशांची आधार क्रमांकाची निर्मिती झालेली नसेल किंवा ज्यांना आधार पत्राच्या छापील प्रतीची आवश्यकता नसेल त्यांच्याकडेन रु. 2/- घेतले जाणार नाहीत. तरी सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यवा. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन करण्यात आले आहे.