उस्मानाबाद -: जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 20 डिसेंबर रोजी सकाळी 10-30 वाजता जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उस्मानाबाद येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता 336 पदांकरिता पात्र व इछुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया करणार आहेत. यात एम.पी. ट्रेंनिग ॲकडमी लि. एमटीई.सोसायटीज, इंद्रवणे पुणे अंतर्गत:- एलिकॉन कॉष्ट ॲलो लि.सनसवाडी,पुणे, एम – टेक्निकल ॲटो लि. सानसवाडी,पुणे, जबील सरक्युटस लि. रांजनगांव,पुणे,मदरसन सुमी सिस्टीम लि. पुणे, जागृती टेक्निकल सर्व्हिसेस, आळंदी देवाची काळेवाडी देहूफाटा,पुणे, महिंद्रा हिनोदय इंडस्ट्रिज लि. उर्से.ता.मावळ जि.पुणे,व महिंद्रा हिनोदय इंडस्ट्रिज लि. भोसरी. पुणे हे त्यांचेकडील 336 पदांकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया करणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :- 1) तांत्रिक पदांसाठी :- आयटीआय कोणताही ट्रेड उत्तीर्ण. 2)इतर पदासाठी :- एस.एस.सी. किंवा एच.एस.सी. किंवा आयटीआय उत्तीर्ण. 3) वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षे. अशी असणार आहे.
उद्योजकांच्या मागणीनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद कार्यालयामार्फत मुलाखतपत्रे पाठविण्यात आलेली आहेत. ज्या उमेदवारांना मुलाखतपत्रे मिळालेली नाहीत. अशा वरील अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहता येईल. तरी वरील तपशिलात नमूद केलेल्या पदासाठी फक्त उस्मानाबाद जिल्हयातील पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी मूळ प्रमाणपत्र व जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, स्वत:चा बायोडाटा, आदी कागदपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी. रोजगार मेळाव्याचे ठिकाणी 20 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या जास्तीत जास्त संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक रमेश पवार यांनी केले आहे.