उस्मानाबाद -: राज्य शासनाच्या  एकात्मिक प्रसिध्दी कार्यक्रमातंर्गत सामाजिक न्याय विभागाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती ग्रामीण भागातील  लोकांना व्हावी या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाच्या कल्याणाकारी योजना फिरत्या पथकाद्वारे प्रसिध्दी करण्यासाठी संवाद यात्रेच्या  माध्यमातून टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर येथून झेंडी दाखवून झाला तर कलापथकाचा शुभारंभ बस स्टँड, तुळजापूर  येथे होऊन कलापथकाचे पथनाटयद्वारे योजनांची माहिती उपस्थित सर्व नागरिकांना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात  तुळजापूर नगरीतून करण्यात आली. त्या दिवशी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा, तिर्थ बु.,बसवंतवाडी आणि अणूदर येथे कार्यक्रम घेण्यात आले.
     फिरत्या पथकाद्वारे शासनाच्या ध्येय धोरणाची, विविध कल्याणकारी योजनांची माहिती  प्रसिध्दी संवाद यात्रेच्या माध्यमातून देण्यात आली तर कलापथकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित माहिती कला पथकाच्या कलेच्या माध्यमातून लोकांना देण्यात आली. जास्तीत जास्त लोकांनी योजना समजावून घेऊन त्याचा लाभ सर्व वंचित घटकांनी घ्यावा हा यामागील उद्देश आहे. अणदूर येथील सामाजीक कार्यकर्ते दयानंद कंकाळे बचत गटाचे डॉ. सावळे याच्यासह बचत गटातील महिला व पुरुष तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. बसस्थानक प्रमुख रामभाऊ हंडेगिरी, वाहतूक निरीक्षक रामचंद्र  शिंदे, सहायक वाहतूक निरिक्षक एम.आर. कोमटवाड आदि नागरिक  व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमास निर्मिती लोकनाटय कलापथकचे प्रमख गौतम माळाळे, सुरेश  देवकुळे,महावीर जानराव,शशीकांत माने, उत्कर्ष माळाळे, श्रीकांत साठे, श्रीधर जोगदंड आणि अंगुबाई वाघमारे हे सहकारी  तर फिरत्या पथकाचे प्रतिनिधी राजू लोणारे हे कलाकार उपस्थित होते.     
 
Top