बार्शी -: येथील कर्नल भोसले चौक येथे मोटारसायकलच्या पंक्चरचे पैसे देत असताना वाहनाला लावलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली.
खामगाव (ता. बार्शी) येथील कैलास इंद्रजीत मडके वय 27 हे उसनवारी घेतलेली रक्कम परत देण्यासाठी बार्शीला आले होते. अरणगाव ता. बार्शी येथून बार्शीला येताना त्यांची मोटारसायकल पंक्चर झाल्याने त्यांनी भोसले चौक येथे वाहन पंक्चर काढून त्याची रक्कम परत देताना लक्ष नसल्याची खत्री करुन अज्ञात चोरटयाने त्यांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी बार्शी पोलीसात कैलास मडके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.