बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) येथील रोटरी क्लबच्यावतीने आदर्शग्राम प्रकल्प महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या लोकसहभागातून ग्रामविकास या विषयावरील परिवसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात शनिवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत होणार असून आ. दिलीप सोपल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, आटके (ता. कराड) येथील अनिल कुलकर्णी, ऊस शेतीतज्ञ आर.सी. पाटील, फलो, औषधे व सुगंधी वनस्पती मंडळाचे व्यव.संचालक एस.एम. देवणीकर, प्रकल्प समन्वयक महावीर जंगटे हे शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विजय खांडवीकर यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव रो.डॉ. मुकूंद तांबारे, प्रकल्प प्रमुख रो. अशोक हेड्डा, रो. गौतम कांकरिया, रो. विनय संघवी, रो. शंतनु जोशी, सयाजी गायकवाड, राजाभाऊ देशमुख हे परिश्रम घेत आहेत.