बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) तालुक्‍यात चांगल्‍या दर्जाचे खेळाडू असूनही त्‍यांच्‍या कला गुणांना वाव देण्‍यासाठी तालुकास्‍तरावर त्‍या दर्जाचे पोषक वातावरण नसल्‍याने तालुका क्रीडा अधिका-याची नेमणूक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांनी जिल्‍हाधिका-यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
    त्‍यांनी दिलेल्‍या निवेदनात कुस्‍ती, खो-खो, कबड्डी, व्‍हॉलीबॉल, मैदानी खेळ या पाच प्रकारचे खेळच तालुका स्‍तरावर खेळविले जात आहेत. ऑलिं‍पीक सारख्‍या ठिकाणी आपल्‍या ग्रामीण भागाती युवक चांगली कामगिरी बजावू शकतात. परंतु त्‍यांना त्‍या प्रकारच्‍या सुविधांचा अभाव असल्‍याने त्‍यांच्‍या कला गुणांना वाव मिळत नाही.  जिल्‍हा स्‍तरावर 42 क्रिडा प्रकारांचे शिक्षण व सराव होतो. खेळाडूंना शासन स्‍तरावरुन अनुदान दिले जाते. परंतु त्‍याचा लाभ मिळविण्‍यासाठी ग्रामीण युवक विद्यार्थ्‍यांना त्‍यापर्यंत पोहचता येत नाही. थोड्याफार सोयीसुविधा झाल्‍यास खात्रीपुर्वक यश मिळविता येणे शक्‍य असल्‍याने तालुकास्‍तरावर क्रीडा अधिका-यांची नेमणूक करण्‍यात यावी, अशी मागणी राहुल भड यांनी केली आहे.
 
Top