बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरीत होऊन येथील फाऊंडेशनच्यावतीने ग्रामस्वच्छतेचे काम हाती घेतले. गाडेगाव (ता. बार्शी) येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी हातात खराटा घेऊन कामाची सुरुवात केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संजय पाटील, पं.सं. सभापती कौसल्या माळी, पं.स. उपसभापती केशव घोगरे, ता.वि. मंचचे विक्रतम सावळे, जयंतराव पाटील, सरपंच राहिबाई लोंढे, बाळासाहेब खराडे आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले, स्वच्छतेची सुरुवात करताना प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी. सार्वजनिक ठिकाणी शौचास बसण्याची सवय मोडली पाहिजे, शौचालय बांधण्यासाठी नळ कनेक्शन देण्यात येतील. कौसल्या माळी बोलताना म्हणाल्या, ग्रामविकासासाठी शासनाच्या वेगवेगळया योजना अंमलात आणल्या जातील, प्रत्येक गावात जनता दरबाराच्या माध्यमातून लोकजागृती केली जाईल. महेश निंबाळकर यांनी बोलताना म्हणाले, अशा प्रकारचे काम करताना गावाला जर आदर्श गाव, निर्मलग्राम पुरस्कार मिळाले तर त्या गावाची कामाची जबाबदारी वाढते. यावेळी केशव घोगरे, विक्रम सावळे, जयवंतराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसरपंच किरण भालके, राहुल भालके, रमेश कासवटे, विजय भोसले, ग्रामसेवक दिगंबर चौधरी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.