भूम -: तालुक्यातील रस्ते विकास कामांसाठी हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांकडे पाठपुरावा करून पुरवणी यादीतून आठ कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याची माहिती आमदार राहुल मोटे यांनी पत्रकाद्वारे दिली.
      भूम तालुक्यातील भूम-पार्डी रस्त्यासाठी तीन कोटी 80 लाख, राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 ते वाशी-दसमेगाव-मांडवा रस्त्यासाठी एक कोटी 20 लाख, आष्टा-आनाळा-शेळगाव मार्गावरील पूल बांधकामासाठी 50 लाख, खासगाव-जवळा-वालवड-पाटसांगवी रस्त्याच्या सुधारणेकरिता दोन कोटी 30 लाख, ईट-गिरवली या रस्त्याकरिता एक कोटी 36 लाख व आष्टा-आनाळा-शेळगाव रस्ता कामाकरिता 57 लाख रुपये निधी मंजूर करून घेतल्याचे पत्रकात म्हटले आहे. सदरील रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याचेही आमदार मोटे यांनी सांगितले.
     भूम तालुक्यातील शहरीसह ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. अनेक महिन्यांपासून याबाबत ओरडही वाढली होती. त्यातच रस्ते विकासासाठी निधी मंजूर झाल्याने आगामी काळात रस्त्यांची दज्रेदार कामे होण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
Top