उस्‍मानाबाद -:   रा.स्व.संघाचे हेमंत शिबीर २३ ते २५ डिसेंबर पर्यंत उस्मानाबाद येथे होत आहे या शिबिरात स्वामी विवेकानंद यांचे विचार जीवन दर्शन युवकांसमोर मांडण्यात येणार आहे. 
        स्वा. विवेकानंदांचे सार्ध शताब्दी वर्ष निमित्त वर्षभर होणार्या विविध कार्यक्रमांची माहिती, या शिबिरात दिली जाणार आहे. याशिवाय सूर्यनमस्कार, योग ,प्राणायाम व्यायाम स्वयंसेवकांचे पथ संचालन होणार आहे इयत्ता ११वि पासून पुढच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर होणार आहे शहरातील व्यंकटेश महाजन महाविद्यालय पाठीमागील मैदानात हे शिबीर होणार आहे जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिराला भेट द्यावी आणि महाविद्या लयीन विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघचालक महादेवराव गायकवाड यांनी केले आहे.
 
Top